Ad will apear here
Next
राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने
डॉ. नीलम गोऱ्हेपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ प्रतिवर्षी दोन व्याख्यानांचे आयोजन केले जाते. या वर्षी या व्याख्यानमालेत लेखिका आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने होणार आहेत. 

मंगळवारी (२३ जुलै) डॉ. गोऱ्हे यांचे ‘स्त्री आणि समाजकारण’ या विषयावर व्याख्यान होणार असून, बुधवारी (२४ जुलै) त्या ‘स्त्री आणि राजकारण’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. ही व्याख्याने ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहेत.

या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चैतन्य बनहट्टी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZNJCC
Similar Posts
‘अंदाजपत्रकामध्ये लिंगसमानता दिसत नाही’ पुणे : ‘स्त्रियांच्या दृष्टीने अंदाजपत्रकात अर्थरचना झालेली नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांची गरज ओळखून गुंतवणूक करण्यापेक्षा महिला मेळावे, महिलांना सरसकटपणे कांडप आणि शिलाई यंत्र वाटप, यांसारखे उपक्रम राबवले जातात. अंदाज पत्रकात लिंगसमानता दिसून येत नाही’, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ
शाहिरीने दुमदुमली साहित्यपंढरी पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिकांची शाहिरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाहीरांनी नामवंत कवींचे पोवाडे सादर केले.
‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’ पुणे : ‘माणूस सर्व कला शिकतो तेव्हा त्याला सौंदर्यदृष्टी येते; पण संगीत शिकतो तेव्हा दृष्टीच सौंदर्यमयी होते. नाटक हे करणाऱ्याच्या मनात असावे लागते. ते नसेल तर नाटकातील गाणे सुरेल होऊ शकत नाही. कारण, नाटकात गाणे हे सोपे काम नाही. संगीत नाटकातले गद्यही सुरात म्हणावे लागते. सूर असतील तरच नाटक यशस्वी होते,’
‘यू-ट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी’ पुणे : ‘सोशल मीडियाच्या युगात आपली सर्जनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे’, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, यू-ट्यूबर आणि ‘साहित्य सेतू’चे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language